‘आजची ज्ञानेश्वरी’

सन २०१० मध्ये सामाजिक वनिकरण संचालनालयाच्या अलिबाग विभागातून सहाय्यक संचालक ह्या पदावरून निवृत्त झालेले श्री. त्र्यंबक चव्हाण यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगवतगीच्या ७०० श्लोकांवर आधारीत असलेल्या बाराव्या शतकातील ९०३२ ओव्यांच्या ‘ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)’ ह्या असामान्य ग्रंथाचे ‘आजची ज्ञानेश्वरी’ हे मराठी ओवीबद्ध स्वरूपातील पुस्तक लिहीले व सन २०११ मध्ये श्रेष्ठ संगणकतज्ञ पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या ‘मल्टीव्हर्सिटी प्रकाशन’ ह्या संस्थेतर्फे त्याचे प्रकाशन करण्यात आले. सन २०१७ अखेर ह्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’ ह्या शासकीय संस्थेतर्फे त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व घटकांना सदर पुस्तकाच्या ४००० प्रतींचे वितरण करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचे अनेक भाविक वारकरी श्रद्धापूर्वक पारायण करतात परंतू सदर ग्रंथाची भाषा ही प्राकृत असल्याने त्याच्या अर्थाचे त्यांना आकलन होत नाही परंतू ‘आजची ज्ञानेश्वरी’चे पारायण केल्याने सर्वांना ज्ञानेश्वरीच्या अर्थपूर्ण पारायणाचा आनंद लुटता येतो हे ह्या पुस्तकाचे फार मोठे वैशीष्टय आहे. ह्या पुस्तकाची सवलतीची किमत रु.४००/- इतकी असून उपलब्धीसाठी इच्छुकांना ९४२२०२४६३६ ह्या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Important Case Law For Forest Officer

अशोक कविटकर, वनक्षेत्रपाल, मोर्शी, अमरावती वन विभाग यांनी संकलीत व संपादित केलेल्या ८२० पृष्ठांच्या ह्या ग्रंथात, ज्याची प्रस्तावना माननीय श्री. पी. बी. सावंत, माजी न्यायाधीश, उच्च न्यायालय व अध्यक्ष, ‘प्रेस कॉन्सील ऑफ इंडिया’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे, भारतीय वन अधिनियम, १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२, वन संवर्धन अधिनियम, १९८०, भारतीय साक्ष अधिनियम, १९७९, गुन्हे पद्धती संहिता, १८७३, उदयो विवाद अधिनियम, १९४७ व न्यायालयाचा अवमान अधिनियम, १९९१ ह्या कायद्यांशी संबंधीत असलेल्या व देशातील विविध न्यायालयांकडून निर्णय दले गेलेया एकूण ८८ न्यायालयीन दाव्यांचा अंतर्भाव केलेला आहे. वन गुन्हे न्यायालयात लढविण्याची जबाबदारी असलेल्या वनाधिकाय्रांच्या  दृष्टीक